आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी भूमिका:रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारल्यानंतर आता दिसणार वैदेहीच्या रुपात, ‘सांग तू आहेस का’मध्ये शिवानी रांगोळेचा लक्ष वेधणारा नवा लूक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नव्या भूमिकेसाठी सज्ज होताना शिवानीने मेकओव्हर करण्याचं ठरवलं.

छोट्या पडद्यावरील ‘सांग तू आहेस का’ या मालिकेच्या प्रोमोजनी सध्या प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. या मालिकेमधून शिवानी रांगोळे एका हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैदेही असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून या लूकसाठी शिवानीने केलेला मेकओव्हर सध्या चर्चेत आहे. शॉर्ट हेअर आणि शिवानीचा ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधून घेत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत शिवानीने साकारलेल्या रमाबाई आंबेडकरांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. शिवानी रमाबाईंची भूमिका खऱ्या अर्थाने जगली. त्यामुळे नव्या भूमिकेसाठी सज्ज होताना तिने मेकओव्हर करण्याचं ठरवलं.

लव्हस्टोरी आणि हॉरर या दोन्ही जॉनरचा अनोखा मिलाफ असणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेविषयी सांगताना शिवानी म्हणाली, ‘रमाबाईंची भूमिका खूपच वेगळी होती. मालिकेची सांगता झाल्यानंतर सांग तू आहेस का मधील वैदेहीच्या भूमिकेसाठी जेव्हा मला विचारणा झाली तेव्हा मी लूक चेंज केला. लूक चेंज केल्यानंतर ती व्यक्तिरेखा सापडायला मदत होते असं मला वाटतं. वैदेही ही व्यक्तिरेखासुद्धा खूपच वेगळी आहे. प्रोमोमध्ये दिसणारा थ्रिलरचा फील प्रत्येक एपिसोडमध्ये जपला जाणार आहे. विशेष म्हणजे ही एक रोमॅण्टिक स्टोरी सुद्धा आहे. त्यामुळे मला काम करताना खूप छान वाटतं आहे.'

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser