आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा10 सप्टेंबर रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात श्रीगणेशाचे आगमन झाले आहे. कुठे दीड दिवस, तर कुठे पाच तर कुठे दहा दिवस बाप्पा पाहुणचाराला आले आहेत. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण बाप्पाची मनोभावे पूजा करत आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता श्रेयस तळपदे याच्या घरीदेखील बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा झाली आहे.
तब्बल सात वर्षांच्या गॅपनंतर श्रेयसकडे बाप्पा पाहुणचाराला आले आहे. स्वतः श्रेयसने बाप्पासोबतचे फोटो शेअर करत ही गोष्ट सांगितली आहे. पण यावेळी त्याने या सात वर्षात त्याच्याकडे गणरायाचे आगमन का झाले नाही, हे मात्र सांगायचे टाळले आहे.
श्रेयसने पत्नी दिप्ती आणि बाप्पासोबतचे फोटो शेअर केले आहेत. यात श्रेयस आणि दीप्ती यांनी त्यांच्या बाप्पासाठी सुंदर फुलांची आरास केलेली दिसत आहे. फोटो शेअर करत श्रेयसने लिहिले, 'बाप्पा 7 वर्षांनंतर घरी आले आहेत. याहून दुसरा मोठा आनंद नाही. पण मी अधिक आनंदी आहे त्याचे कारण म्हणजे माझ्या शेजारी उभी असलेली ही स्त्री, माझी पत्नी... गणरायाच्या आगमनाने तिच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. सजावट करण्यापासून ते बाप्पाच्या नैवेद्यापर्यंत सर्वकाही तिला स्वतः करायला आवडते. आणि एवढ्या वर्षांचे अंतर का? तर ती दुसरी कथा आहे… त्यावर आज बोलायला नको... नंतर कधीतरी सांगेने तोपर्यंत… गणपती बाप्पा मोरया..', असे श्रेयस म्हणाला आहे.
श्रेयसच्या घरी दीड दिवस बाप्पा विराजमान असतो. सध्या श्रेयस छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेत त्याच्यासह अभिनेत्री प्रार्थना बेहरे मुख्य भूमिका साकारत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.