आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसऱ्याला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला:श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे  खेळणार 'आपडी-थापडी'चा खेळ, टिझर आला समोर

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्या 'आपडी थापडी' या बहुचर्चित चित्रपटाचा टिझर लाँच करण्यात आला आहे. एक मनोरंजक गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली असून 5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट सहकुटुंब चित्रपटगृहात पाहता येईल.

के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या 'आपडी थापडी' या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीता करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तर सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन आहे. 'फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट उलगडली आहे.

बघा टिझर

अतिशय कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटील अर्थात श्रेयस तळपदे, त्याची पत्नी अर्थात मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी असं पाटील कुटुंब या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सखाराम पाटीलच्या कंजुषीची उदाहरणं चित्रपटाच्या टिझरमध्ये आपल्याला पाहता येतात. पण या बरोबरच या कथेला एक भावनिक किनार असल्यांचही टिझरमधून दिसतं. त्यामुळे टिझर पाहून पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला दसऱ्याची वाट पाहावी लागणार आहे.

या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणा-या श्रेयस तळपदेनं मराठी मालिका आणि चित्रपटांतून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर त्यानं हिंदी चित्रपटांत आपलं स्थान निर्माण केलं. "बाजी" आणि "पोस्टर बॉईज"या चित्रपटांनंतर जवळपास सात वर्षांनी श्रेयस तळपदे पुन्हा एकदा मराठी चित्रपटात दिसणार आहे. त्याच्याबरोबर मुक्ता बर्वेसारखी सशक्त अभिनेत्री असल्यानं आपडी-थापडी नक्कीच प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...