आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शुभमंगल ऑनलाईन'मध्ये लगीनघाई सुरू:मेंदीच्या रंगाने खुलणार प्रेमाची कळी, शर्वरीच्या हातावर चढणार शंतनूच्या प्रेमाचा रंग

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घराच्या घरी मेंदीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेमध्ये शंतनूच्या प्रयत्नांना यश आले आहे. आता अखेर मालिकेत शंतनू - शर्वरी लग्नबंधनात बांधले जाणार आहेत. कारण, शर्वरीच्या आईने म्हणजेच माधुरीने दोघांच्या लग्नास होकार दिला आहे. अनुपमा, शर्वरी, शंतनू सगळेच खुश आहेत.

घराच्या घरी मेंदीचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला आहे. पण, माधुरी मात्र तितकशी आनंदी दिसत नाहीये. कारण, शंतनू शर्वरीसाठी योग्य नाही असे तिचे ठाम मत आहे. जगदीशने माधुरीला ताकीद दिली आहे सगळं काही सुरळीत सुरू असताना आता मिठाचा खडा टाकलास तर मी तुला घटस्फोट देणार. पंरतू माधुरी यामधील कुठलीच गोष्ट शर्वरीला सांगू शकत नाही.

सर्व अडथळे पार करत अखेर लग्नाच्या पवित्र बंधनात शंतनू – शर्वरी जोडले जाणार आहेत. शर्वरीच्या हातावर शंतनूच्या प्रेमाचा रंग चढणार आहे. शंतनू-शर्वरीची ही लगीनघाई बघायला विसरु नका.

बातम्या आणखी आहेत...