आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिद्धार्थ-मितालीची लगीनघाई:सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीला लागली हळद, फोटो शेअर करुन सिद्धार्थ म्हणाला - अरं हलद लागली...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लवकरच हे दोघे विवाहबद्ध होत आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील क्यूट कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पुढच्या काही तासांत विवाहबद्ध होत आहेत. सध्या दोघांच्याही घरी लग्नाच्या आधीच्या विधी सुरु आहेत. नुकताच सिद्धार्थच्या घरी ग्रहमखाचा विधी संपन्न झाला होता. त्यानंतर आज दोघांनाही हळद लागली आहे. सिद्धार्थने हळदीचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. अरं हलद लागली... असं कॅप्शन सिद्धार्थने या फोटोला दिले आहे.

तर शेअर केलेल्या या फोटोला यलो फॅमिली असे त्याने म्हटले आहे.

यापूर्वी सिद्धार्थने ग्रहमखाच्या विधीचा फोटो शेअर केला होता. 'सोड मुंज झाली. आता जातो काशीला. ओके बाय. #grahmak”, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.

2019 मध्ये सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा पार पडला. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. आता हे आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...