आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची लगीनघाई:सिद्धार्थची झाली सोड मुंज, ग्रहमखचा फोटो शेअर करुन गमतीने म्हणाला - 'सोड मुंज झाली, आता जातो काशीला...'

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिद्धार्थ आणि मिताली आता आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करत आहेत.

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. अभिज्ञा भावे, मानसी नाईक, आशुतोष कुलकर्णी या मराठी कलाकारांनी नववर्षात लग्नगाठ बांधून आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. आता पुन्हा एक सेलिब्रिटी कपल लवकरच बोहल्यावर चढणार आहे. आम्ही बोलतोय सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्याबद्दल. सध्या या दोघांच्या घरी लग्नापूर्वीच्या विधी, सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. याचे काही फोटो सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

सिद्धार्थच्या घरी नुकताच ग्रहमखाचा कार्यक्रम पार पडला असून यावेळी त्याची सोड मुंजदेखील करण्यात आली आहे. या कार्यक्रमातील फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'सोड मुंज झाली. आता जातो काशीला. ओके बाय. #grahmak”, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.

दुसरीकडे मितालीनेसुद्धा मांडव पुजनाचा फोटो शेअर केला आहे.

2019 मध्ये सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा पार पडला. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. आता हे आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...