आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रेलर आउट:सिद्धार्थ चांदेकर-सखी गोखलेच्या ‘बेफाम’चा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 26 फेब्रुवारी रोजी ‘बेफाम’ चित्रपट होणार महाराष्ट्रभर प्रदर्शित

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सखी गोखले यांची नवी कोरी जोडी बेफाम या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. यश आणि अपयशाचे समीकरण मांडणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर एक वेगळाच प्रवास दर्शवितो.

सिद्धार्थ आणि सखीची ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थला यशाच्या शिखरावर पोहोचण्यास कारणीभूत असलेल्या सखीची मैत्री, प्रेम आणि विश्वास याचे उत्तम समीकरण साधण्यात आले आहे.

अमोल कागणे फिल्म्स प्रस्तुत निर्माता अमोल लक्ष्मण कागणे निर्मित हा चित्रपट दिग्दर्शक कृष्णा कांबळे दिग्दर्शित आहे. शिवाय ‘बेफाम’ हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण एकनाथराव कागणे आणि अभिनेत्री प्रीतम लक्ष्मण कागणे प्रस्तुत असून लेखक विद्यासागर अध्यापक लिखित या चित्रपटाचे कथानक आहे. सिद्धार्थ आणि सखीसह या चित्रपटात अभिनेते विद्याधर जोशी, शशांक शेंडे, कमलेश सावंत, महादेव अभ्यंकर, नचिकेत पर्णपुत्रे आणि अभिनेत्री सीमा देशमुख यांचा उत्तम अभिनय पाहायला मिळणार आहे.

उभ्या ठाकलेल्या संकटांना निडरपणे तोंड देणे ही उत्तम शिकवण देणारा आणि अपयशाकडून यशाच्या शिखरावर नेत आपले आयुष्य सुखकर करणारा असा सकारात्मक ऊर्जा देणारा हा 'बेफाम' चित्रपट येत्या 26 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.