आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपकमिंग फिल्म:मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहे  सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखलेची जोडी, या तारखेला रिलीज होतोय  'बेफाम'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'बेफाम' चित्रपट येत्या 26 फेब्रुवारी होणार प्रदर्शित

अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि सखी गोखले ही नवी जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बेफाम' हे त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव असून नुकतीच त्याची रिलीज डेट समोर आली आहे. येत्या 26 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि सखीची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थला यशाच्या शिखरावर पोहोचण्यास कारणीभूत असलेल्या सखीची मैत्री, प्रेम आणि विश्वास याचे उत्तम समीकरण साधण्यात आले आहे. अशा या फ्रेश जोडीला 'अमोल कागणे स्टुडिओज' द्वारे 'बेफाम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे.

अमोल कागणे फिल्म्स प्रस्तुत, निर्माता अमोल लक्ष्मण कागणे निर्मित हा चित्रपट दिग्दर्शक कृष्णा कांबळे यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच निर्माता मिथिलेश सिंग राजपुतने या चित्रपटाकरिता एक्झिक्युटिव्ह आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसरची भूमिका पार पाडली आहे.

'हलाल', 'लेथ जोशी', 'परफ्युम', 'वाजवूया बँड बाजा' या चित्रपटांच्या निर्मिती आणि प्रस्तुती नंतर अमोलचा 'बेफाम' हा आगळा वेगळा विषय हाताळणारा चित्रपट प्रेक्षकांकरिता सज्ज आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण एकनाथराव कागणे आणि अभिनेत्री प्रीतम लक्ष्मण कागणे प्रस्तुत हा चित्रपट असून लेखक विद्यासागर अद्यापक लिखित या चित्रपटाची कथा आहे. गायक अमित राज, मंदार खरे यांच्या सुमधुर स्वरात चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेतच शिवाय चित्रपटातील संगीत दिग्दर्शकाची धुरा अमित राज आणि मंदार खरे यांनी उत्तमरित्या पेलली आहे. तर गायक क्षितिज पटवर्धन यांच्या संगीत लहरींवर या चित्रपटातील गाण्यांनी चारचाँद लावले आहेत.

सिद्धार्थ आणि सखीसह या चित्रपटात अभिनेते विद्याधर जोशी, कमलेश सावंत आणि अभिनेत्री सीमा देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.