आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी इंडस्ट्रीतील क्यूट कपल म्हणून सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांना ओळखले जाते. गेल्यावर्षी दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नाच्या काही महिन्यांनी दोघांनी मुंबईत स्वतःचा नवा आशियाना घेतला. आता सिद्धार्थने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्याच्या स्वप्नातील घराची खास झलक चाहत्यांना दाखवली आहे. हा व्हिडिओ पाहून कुणीही या घराच्या प्रेमात पडावे, असे सिद्धार्थ आणि मितालीचे हे नवीन घर आहे.
त्यांच्या घराबाहेर ‘चांदेकर’ अशी नावाची पाटी लावली आहे. प्रवेश केल्यानंतर घरात प्रशस्त हॉल असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच हॉलच्या खिडकीतून मुंबईचे दर्शनही होत आहे. शिवाय घरात मिताली-सिद्धार्थच्या लग्नसोहळ्यातील खास क्षणांचे फोटोदेखील बघायला मिळतात. छोट्या मोठ्या डेकोरेटिव्ह वस्तूंनी घरातील एक एक कोपरा त्यांनी सजवला आहे.
सुकन्या मोने, आदिनाथ कोठारे, प्रसाद ओक, प्रियांका बर्वेसह अनेक कलाकारांनी सिद्धार्थच्या व्हिडिओवर कमेंट करत घराचे कौतुक केले आहे. शिवाय चाहतेदेखील घर किती सुंदर सजवलंय म्हणत, मिताली आणि सिद्धार्थवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
मराठी मनोरंजनविश्वातील क्यूट कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दोघांनी नुकतीच त्यांच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. या दोघांनी त्यांच्या स्वप्नपूर्तीबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. दोघांनीही सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर स्वप्ननगरी मुंबईत नवीन घर खरेदी केल्याची गोड बातमी सगळ्यांना दिली आहे.
सिद्धार्थ आणि मिताली यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत दोघांच्याही अंगठ्याला शाई लागलेली दिसत आहे. सोबतच त्यांनी हटके कॅप्शनही दिले आहे. सिद्धार्थने फोटो शेअर करत, “एक नवी सुरुवात… मुंबईतील आमचे पहिले घर”, असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यासोबत त्याने #tinypandahouse असा हॅशटॅगही शेअर केला आहे. वाचा सविस्तर..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.