आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासारेगमप लिट्ल चॅम्प्स या सांगितिक रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धीझोतात आलेली गायिका कार्तिकी गायकवाड सांगतेय तिच्यासाठी का खास आहे रक्षाबंधनाचा सण...
कार्तिकी म्हणते, रक्षाबंधन हा माझा खूप आवडीचा सण आहे. मला कौस्तुभ आणि कैवल्य हे दोन भाऊ आहेत. प्रत्येकवर्षी मी या सणाची आतुरतेने वाट पाहत असते आणि ते दोघे मला काय गिफ्ट देणार आहेत याची देखील मला उत्सुकता असते. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, मला इतके गोड भाऊ भेटले आहेत. भावाबहिणीचं नातं हे खूप गोड असतं. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना ही म्हण प्रत्येक भावंडाना लागू होते असं मला वाटतं, असं कार्तिकी सांगते.
आपल्या भावांबद्दल कार्तिकी पुढे सांगते, माझ्या भावांबद्दल सांगायचं तर आम्ही तिघेही बाबांचा संगीताचा वारसा चालवतोय. कौस्तुभ आणि कैवल्य देखील संगीत क्षेत्रात नाव कमवत आहेत. त्यामुळे त्यांची उत्तरोत्तर खूप प्रगती होवो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. मी गाण्यासोबतच झी टॉकीजवरील गजर कीर्तनाचा या कार्यक्रमाचं चित्रीकरण देखील करतेय. पण रक्षाबंधनच्या दिवशी मी घरी आहे आणि मी तितक्याच जोमात यंदा हा सण साजरा करणार आहे. यावर्षीदेखील हे दोघे मला काय गिफ्ट देणार आहेत याची मला उत्सुकता आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.