आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

यंदा कर्तव्य आहे!:गायिका कार्तिकी गायकवाड होणार पुण्याची सून, 26 जुलै रोजी आहे साखरपुडा 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्यवसायाने रोनित मॅकेनिकल इंजिनियर आहे.
Advertisement
Advertisement

'सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स'ची विजेती गायिका कार्तिकी गायकवाड हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कार्तिकीचे लग्न ठरले असून नुकताच पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. रोनित पिसे हे कार्तिकीच्या भावी नव-याचे नाव असून तो पुण्याचा आहे. व्यवसायाने रोनित मॅकेनिकल इंजिनियर आहे, शिवाय त्यांचा स्वतःचा व्यवसायदेखील आहे. 

कार्तिकीचा येत्या 26 जुलैला रोनित पिसेसोबत साखरपुडा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अगदी घरच्या घरी सर्व नियम पाळून होणार आहे. कार्तिकीचे वडील कल्याणजी गायकवाड यांच्या मित्रपरिवारातील हे कुटूंब आहे. रोनित आणि कार्तिकी यांचे अरेंज मॅरेज असून अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख ठरली नसल्याचे समजते. 

Advertisement
0