आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सारेगमप लिट्ल चॅम्पसची विजेती आणि गायिका कार्तिकी गायकवाड नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.
लग्नानंतर आता कार्तिकी पुण्याची सून झाली आहे. रोनित पिसे असं कार्तिकीच्या पतीचं नाव आहे.
रोनित मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
कार्तिकीच्या लग्नाला सारेगमप लिटिल चॅम्प्सचं रियुनियन बघायला मिळालं.
आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैश्यंपायन यांनी कार्तिकीच्या लग्नाला हजेरी लावली होती. याशिवाय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही देखील या सोहळ्याला उपस्थित होती.
कार्तिकी आणि तिचे वडील गायक-संगीतकार कल्याणजी गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लग्नाचं निमंत्रण दिले होते.
जुन महिन्यात कार्तिकीच्या घरी कांदेपोह्याचा म्हणजेच पाहण्याचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
कार्तिकीचे वडील कल्याणजी गायकवाड यांच्या मित्राच्या मुलासोबत कार्तिकीचं लग्न झालं.
26 जुलै रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला होता.
'माझ्या ध्यानीमनी नसताना अगदी अनपेक्षितपणे सगळं घडलं. माझे होणारे सासरे हे वडीलांचे जुने स्नेही आहेत. पत्रिका बघून, बघण्याचा वगैरे कार्यक्रम होऊन हे रीतसर अरेंज्ड मॅरेज ठरलं आहे. आम्हा दोघांची क्षेत्रं खूप वेगळी आहेत. त्यांच्याकडेही संगीताची आवड आहे. कलेविषयी आदर आहे. अगदी स्वत: गाणारे नसले, तरी ते कानसेन आहेत', असं कार्तिकीनं एका मुलाखतीत म्हटलं होतं.
रोनित उत्तम तबला वाजवतो.
सारेगमप लिटिल चॅम्स मराठीच्या पहिल्या पर्वाची कार्तिकी विजेती ठरली.
कार्तिकी सध्या गायिका म्हणून आपल्या सर्वांनाच माहीत आहे.
कार्तिकीनं 'गजर कीर्तनाचा' या कार्यक्रमाची निवेदिका म्हणून प्रेक्षकांसमोर आली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.