आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:गायिका वैशाली भैसने-माडे हिला जीवे मारण्याची धमकी, स्वतः पोस्ट शेअर करत म्हणाली - 'माझ्या हत्येचा कट रचला जात आहे'

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय आहे वैशाली भैसने- माडेची पोस्ट?

प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने- माडेने हिच्या एका फेसबुक पोस्टने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. वैशालीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत तिच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे, असे ती म्हणाली आहे.

काय आहे वैशाली भैसने- माडेची पोस्ट?

फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टवर वैशालीने लिहिले की, 'काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. दोन दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन मी याचा गौप्यस्फोट करणार आहे. आज मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे.'

राजकारणात केला आहे प्रवेश
काही महिन्यांपूर्वी वैशालीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैशालीचे स्वागत केले होते. वैशालीच्या प्रवेशाचा कार्यक्रम पक्षाच्या मुंबई येथील मुख्यालयात झाला होता. वैशालीला विदर्भाचे विभागीय अध्यक्षपद देण्यात आले आहे.

सारेगमपमधून पोहोचली घराघरांत
वैशालीचा जन्म 21 ऑगस्ट 1984 रोजी अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथे एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. अतिशय खडतर प्रवासानंतर वैशालीने संगीत क्षेत्रात यश मिळवले आहे. लहानशा खेड्यात जन्मलेली, वाढलेली शेतकरी कुटुंबातील ही मुलगी. त्या गावात पंधरा-सोळा वर्षांपूर्वीपर्यंत डोक्यावर हंडे घेऊन बाहेरगावाहून पाणी आणावे लागयचे. शेती हाच मुख्य व्यवसाय होता. आपली शेती दुस-याला मक्त्याने देऊन मिळालेल्या पैशात संसार चालवायचा. दुपारचे जेवण मिळाले, तर रात्रीचे काय, अशा विवंचनेत जगत असलेले हे कुटुंब. अशा हलाखीच्या परिस्थिती वैशालीचे बालपण गेले.

'सारेगमप' या स्पर्धेच्या माध्यमातून वैशाली घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांमध्ये तिने पार्श्वगायन केले आहे. 'बाजीराव मस्तानी' या हिंदी चित्रपटातील 'पिंगा' हे तिने गायलेले गाणे प्रचंड गाजले. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आल आहे. 'कलंक' या हिंदी चित्रपटातील 'घर मोरे परदेसिया' हे गाणेदेखील तिने गायले आहे.

बातम्या आणखी आहेत...