आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत येणार सहा वर्षांचा लीप:दुरावलेल्या दीपा कार्तिकला त्यांच्या मुली पुन्हा एकत्र आणतील का!

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीपा आणि कार्तिकही सेटवरच्या या छोट्या दोस्तांना भेटून खुपच खुष आहेत.

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेच्या कथानकात सहा वर्षांचा लीप आला असून दीपा आणि कार्तिकच्या दोन्ही मुली आता मोठ्या झाल्या आहेत. दीपिका आणि कार्तिकी असं या दोघींचं नाव असून आता दुरावलेल्या कार्तिक आणि दीपाला या दोघी एकत्र आणणार का याची उत्सुकता वाढली आहे.

चिमुकल्या दीपिका आणि कार्तिकीला आपण याआधी काही भागांमधून भेटलोच आहे. आता लीपनंतर मोठ्या झालेल्या दीपिका आणि कार्तिकीला 20 सप्टेंबरच्या विशेष भागातून भेटण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सध्या या दोघींच्या प्रोमोजना भरभरुन प्रतिसाद मिळत असून दोघींची सेटवर खूप छान गट्टी जमली आहे. दीपा आणि कार्तिकही सेटवरच्या या छोट्या दोस्तांना भेटून खुपच खुष आहेत. त्यामुळे मालिकेचे यापुढील भाग अतिशय रंगतदार असणार यात शंका नाही.

बातम्या आणखी आहेत...