आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामालिकेच्या माध्यमातून रसिकांच्या मनोरंजनाची जबाबदारी पार पाडत असतानाच पडद्यामागे देखील कलाकारांची धमाल अविरतपणे सुरु असते. सोशल मीडियावरचं कोणतंही चॅलेंज असलं तरी ही कलाकारमंडळी मागे नसतात. नुकतंच छोट्या पडद्यावरील काही कलाकारांनी एका सुपरहिट तमिळ सिनेमातल्या सुपरहिट गाण्यावर ठेका धरला.
यामध्ये ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेता आणि कार्तिक म्हणजेच अनघा अतुल आणि आशुतोष गोखले यांनी सहभाग घेतला. पडद्यावर या दोघांचं फार पटत नसलं तरी पडद्यामागची या दोघांची केमिस्ट्री खरोखर वाखाणण्याजोगी होती.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या टीमच्या उत्साहालाही तोड नाही. या मालिकेतील गौरी म्हणजेच गिरीजा प्रभूने आपल्या सहकलाकारांसोबत ठेका धरला. गिरीजा उत्त्तम नृत्यांगना आहे त्यामुळे या नव्या चॅलेंजमध्ये सहभागी होत तिने धमाल केली.
‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील ढवळे मामी म्हणजेच किशोरी अंबिये सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. त्यांनी देखिल सरु, अंजी आणि अवनीसोबत या हटके गाण्यावर आपल्या हटके अंदाजात ठेका धरला. सहकुटुंब सहपरिवार मालिकेची ही लेडी गँग सध्या या गाण्याच्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे.
गौरी प्रमाणेच 'मुलगी झाली हो' मालिकेतील माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर देखील यात मागे नव्हती. व्हिडिओमधील तिचा सोज्वळ अंदाज भाव खाऊन गेला.
या सर्व व्हिडिओंना सोशल मीडियावर लाखांमध्ये व्हूज आहेत. इतर माध्यमांवर देखील हे व्हिडिओज भरभरुन व्हायरल होताना दिसत आहेत. मालिकांप्रमाणेच कलाकारांची पडद्यामागची धमाल प्रेक्षकांना आवडत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.