आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षकांच्या भेटीस:सोलापूरच्या दीप्ती धोत्रेची 'भिरकीट' चित्रपटामधून दमदार एन्ट्री, साकरली नगरसेविकेची भूमिका

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्लासिक निर्मिती संस्था निर्मित अरुण जगदाळे दिग्दर्शित "भिरकीट" या मराठी चित्रपटांमध्ये सोलापूरची अभिनेत्री दीप्ती धोत्रे हिची प्रमुख भूमिका सोलापूरच्या रसिकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या महिन्यात लवकरच प्रदर्शित होणार असून यातून सोलापूरच्या दीप्तीची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. सोलापूरचाच नाट्य कलाकार हंबीरराव मोहिते या चित्रपटात सोलापूरचा संतोष कासे याने देखील पौरहित्याची भूमिका साकारली असून त्या भूमिकेत संतोष गाजतो आहे.

गेल्या अनेक वर्षापासून चित्रपट क्षेत्रात सुरुवातीपासून आता पर्यंत प्रवास करणाऱ्या दिप्ती धोत्रे हिने एक नवीन चित्रपट रसिकांच्या भेटीला आणला आहे. यात तिची प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व ही भूमिका असून सायली या तिच्या भूमिकेला वठवताना आपल्याला खूप आनंद मिळाला. स्त्रीची राजकारणातली कारकीर्द कशी असते तिला कसे सामोरे जावे लागते आणि बऱ्याच गोष्टी यातून मला शिकता आल्या असे ती आवर्जून सांगते. या चित्रपटाच संपूर्ण शूटिंग हे साताऱ्याला झाले असून चित्रपटात प्रमुख भूमिकेत सागर कारंडे असून त्यांच्या पत्नीची भूमिका दीप्तीने वठवली आहे. दिप्तीने यापूर्वी एक थि बेगम वेबसिरीज विजेता, शेर शिवराय, मुळशी पॅटर्न या चित्रपाटमधून काम केले आहे. तर नुकताच राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त झालेल्या "भोंगा" या मराठी चित्रपटात आईची प्रमुख भूमिका वठविली आहे.

संतोषचा पौरोहित्य सोलापुरात गाजला

प्रवीण तरडे फेम " सरदार हंबीरराव मोहिते" या चित्रपटात सोलापूरच्या संतोष लक्ष्मण कासे या युवा कलावंताने एका पौरोहित्याची भूमिका साकारली आहे. भूमिका जरी छोटी असली तरी मोठ्या चित्रपटात सोलापूरच्या युवा कलावंताला संधी मिळाली आहे ही बाब मोठी आहे. संतोषने आजवर अनेक नाटकांमधून पारितोषिके प्राप्त केली आहेत. तर लघुपटांना देशात अनेक राज्यांमध्ये सादर करून पारितोषिके प्राप्त करण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.

भिरकीटमध्ये माझी भूमिका छान

भीरकिट या चित्रपटांमध्ये माझी अनोखी भूमिका असून या भूमिकेने मला खूप काही शिकवलं. सोलापूर सारख्या छोट्या शहरातून मोठ्या शहरात जाउन चंदेरी दुनियेत आपण काहीतरी वेगळं साकारणं ही बाब माझ्यासाठी खूप महत्त्वाची वाटते. जसा मला हा चित्रपट करताना छान वाटले तसेच मला या चित्रपटात पाहताना सोलापूरकरांना नक्कीच आनंद होईल आणि अभिमान वाटेल, अशी माझी भूमिका आहे, असे अभिनेत्री दीप्ती धोत्रेने म्हटले.

बातम्या आणखी आहेत...