आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिलेशनशिप:कुणालसोबत आहे सोनालीची जुनी ओळख, दोघांचे हे रोमँटिक फोटो पाहिलेत का तुम्ही! 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुणालला सोनाली मागील दोन वर्षांपासून ओळखते.

मराठी चित्रपटसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा झाला आहे. आपल्या वाढदिवशी म्हणजे 18 मे रोजी सोनालीने तिच्या साखरपुड्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या 2 तारखेला दुबईत सोनालीने कुणाल बेनोडेकर या तरुणासोबत साखरपुडा केला. 

खरं तर  'क्लासमेट्स' या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान सोनालीने लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याबाबत सोनालीने स्वतः खुलासा केला होता. त्यावेळी हा विषय फक्त गमतीने चित्रपटाच्या सेटवर घेतला गेला, पण काही फोन आल्यावर ही साधी अफवा नसल्याचे माझ्या लक्षात आले, असे सोनालीने सांगितले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी सोनालीने तिच्या आयुष्यातील 'मितवा' कोण आहे हे सांगितले होते. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून तिच्या होणाऱ्या पार्टनरची ओळख करून दिली होती.  

सोनाली आणि कुणाल यांची तशी जुनी ओळख आहे. कुणालच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 2018 पासून सोनालीसोबतचे त्याचे फोटो बघायला मिळतात. या फोटोत दोघांची रोमँटिक केमिस्ट्री लक्ष वेधून घेते. 2018 मध्ये त्यांनी दिवाळी सोबत साजरी केल्याचेही फोटो आहेत. या दोन वर्षांत सोनालीने कुणालसोबतच आपले नाते सिक्रेट ठेवले होते. मात्र यावर्षी तिने कुणालची ओळख आपल्या चाहत्यांना करुन दिली आणि आता हे दोघे लवकरच साता जन्माच्या गाठीतही अडकणार आहेत.  

सोनालीचा भावी पती कुणाल बेनोडेकरला 'केनो' या नावानेही ओळखतात. कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. त्याचे शिक्षण लंडनमधल्या 'मर्चंट्स टेलर स्कूल'मध्ये झाले. त्यानंतर 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स'मधून त्याने उच्च शिक्षण घेतले. सोनालीने अद्याप तिच्या लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.  

बातम्या आणखी आहेत...