आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा चित्रपट:'या' चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आल्या सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे, बघा चित्रपटाचे पहिले पोस्टर

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

चित्रपटसृष्टीतील दोन खास मैत्रिणी मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांच्याविषयी. 'मितवा', 'ती अँड ती' या चित्रपटांत या दोघींनी एकत्र काम केले होते. यानंतर आता या दोघी 'फ्रेश लाईम सोडा' या नवीन चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर सोबत दिसणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा नवरा अभिषेक जावकर लेखक आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणआर आहे. या चित्रपटाची निर्मिती रेडबल्ब मूवी, अनपॅरारल्ड मीडिया आणि फ्लेजर्स एंटरटेनमेंट करणार आहेत. हा चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...