आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसच्या घरात 'झिम्मा'चं प्रमोशन:बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार खास पाहुणे, सोनाली कुलकर्णी म्हणाली - 'अरे माझं स्वप्नं होतं...'

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खास पाहुणे बिग बॉसच्या घरात सदस्यांसोबत धमाल करताना दिसणार आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार खास पाहुणे... हो ! म्हणजेच 'झिम्मा' चित्रपटाचे कलाकार आज सदस्यांना भेटायला घरामध्ये जाणार आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, मृण्मयी गोडबोले आणि क्षिती जोग बिग बॉसच्या घरात सदस्यांसोबत धमाल करताना दिसणार आहेत.

सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले यांनी सदस्यांशी संवाद साधला. बिग बॉस यांनी सोनाली आणि मृण्मयी यांचे स्वागत केले. यावेळी सोनाली गमतीने म्हणाली, 'अरे माझं स्वप्नं होतं की कधीतरी बिग बॉसने माझं नावं घ्यावं. खरंतर मी ही फिल्म केली... लंडनला जाऊन शूट करायला मिळेल, चांगला सिनेमा, रोल आहे यामुळे नाही. तर मला माहिती होतं याचं प्रोमोशन बिग बॉस मध्ये होणार आहे.”

काल “मिशन नॉमिनेशन” हे कार्य घरामध्ये पार पडले. ज्यामध्ये स्नेहा, उत्कर्ष, गायत्री, मीरा, दादूस, सोनाली हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले. बघुया या आठवड्यात कोण जाणार घराबाहेर ? आणि कोण होणार सेफ ?

बातम्या आणखी आहेत...