आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालवकरच झी मराठी वाहिनीवर झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा दाखवण्यात येणार आहे. सिनेविश्वातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा सन्मान या सोहळ्यात केला जातो. या सोहळ्यामध्ये सिनेसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळते. यावर्षी खास पाहुणी म्हणून झी चित्र गौरवमध्ये बॉलिवूडमधली नव्हे तर थेट दक्षिणेतील एक नावाजलेली अभिनेत्री हजेरी लावणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहणार आहे.
मराठी लावणीवर थिरकणार रश्मिका, वन टेकमध्ये केली लावणी
यावर्षीच्या झी चित्र गौरव 2023 सोहळ्याचे खास आकर्षण प्रेक्षकांची लाडकी श्रीवल्ली अर्थातच रश्मिका मंदान्ना आहे. या सोहळ्यात ती अप्रतिम लावणीवर ठेका धरताना दिसणार आहे. विशेष म्हणजे ही लावणी तिने वन टेकमध्ये केली आहे,सोबतच ती निलेश साबळे आणि अवधूत गुप्ते यांच्यासोबत काही मराठी किस्से देखील शेअर करताना दिसेल.
अलीकडेच मराठी बोलताना दिसली रश्मिका
अलीकडेच झी मराठीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रश्मिका 'झी मराठी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्या'चे आमंत्रण पत्र वाचताना दिसली. यावेळी ती म्हणाली की, 'मराठी लावणीवर नाचायचे आहे का?' यानंतर रश्मिकाने खास मराठीमध्ये 'नमस्कार मंडळी' असेही म्हटले. ती पुढे म्हणाली की, 'मी आहे तुमची श्रीवल्ली, मी तुमचे मन जिंकायला झी चित्र गौरवमध्ये येतेय.'
आता श्रीवल्लीला मराठी लावणीवर सादरीकरण करताना पाहणे ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. येत्या 26 मार्च रोजी झी चित्र गौरव पुरस्कार 2023 सोहळा प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर बघता येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.