आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
‘कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे’, असे म्हणत ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात येता आठवडा हा प्रजासत्ताक दिन विशेष आठवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान 26 जानेवारीच्या विशेष भागात 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर काही खास पाहुणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या कार्यक्रमाचे खास फोटो आणि व्हिडिओ झी मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत.
आयपीएस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील, जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम, डॉ. तात्याराव लहाने आणि ग्लोबल पुरस्कारप्राप्त रणजित डिसले गुरुजी अशी दिग्गज मंडळी आपापल्या कुटुंबासह या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
यावेळी मंचावर हे विविध क्षेत्रातील दिग्गज आपले अनुभव व्यक्त करताना दिसतील.
यावेळी ‘हवा येऊ द्या’च्या मंचावर न्यायालय अवतरणार आहे. यात कोणावर कोणते आरोप होणार आणि त्यातून काय धमाल येणार हे बघणे रंजक ठरणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.