आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आगळावेगळा प्रयोग:कलाकार पोहोचले चाहत्यांच्या घरी,  या नव्या तंत्रज्ञानामुळे चाहत्यांना घरबसल्या घेता आला लाडक्या कलाकारांच्या भेटीचा आनंद

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठी टेलिव्हिजनवर असा प्रयोग आजवर झालेला नाही.

मालिकेच्या रुपात चाहते त्यांच्या लाडक्या मालिकांमधील कलाकारांना दररोज भेटत असतात. पण या कलाकारांची प्रत्यक्ष भेट व्हावी ही इच्छा प्रत्येक चाहत्याच्या मनात असते. कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष भेट घेणं शक्य नसल्यामुळे स्टार प्रवाहने चाहत्यांसाठी एक अनोखी संधी उपलब्ध करुन दिली.

ऑगमेंटेड रिऍलिटी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चाहत्यांना घरबसल्या स्टार प्रवाहच्या परिवाराला आभासी भेटता आला इतकंच नाही तर या परिवारासोबतच्या भेटीचा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैदही करण्यात आला. मराठी टेलिव्हिजनवर असा प्रयोग आजवर झालेला नाही. त्यामुळे चाहत्यांकडून या अनोख्या उपक्रमाचं कौतुक होत आहे.

स्टार प्रवाहवरील सगळ्याच मालिकांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. अनिरुद्ध-अरुंधती, जयदीप-गौरी, सौंदर्या इनामदार, नंदिनी शिर्केपाटील, अंजी पश्या, दीपा कार्तिक, शुभम कीर्ती ही सगळीच पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. त्यामुळे स्टार प्रवाहच्या परिवाराच्या या आभासी भेटीचा आनंद म्हणजे चाहत्यांसाठी अनोखी पर्वणी ठरली.

येत्या 4 तारखेला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा रंगणार आहे. त्यामुळे चाहतेही या स्टार परिवाराचा एक भाग झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...