आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणशोत्सव 2021:मराठमोळ्या नायिकांचा अनोखा अंदाज, संजना, अरुंधती, सौंदर्या, गौरी आणि शालिनीच्या हटके लूकची चर्चा

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविवार 12 सप्टेंबरला संध्याकाळी 7 वाजल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घरबसल्या घेता येईल.

स्टार प्रवाहवर 12 सप्टेंबरला प्रसारित होणाऱ्या ‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2021’ या गणपती विशेष कार्यक्रमाच्या प्रोमोजनी सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. या विशेष कार्यक्रमात स्टार प्रवाहच्या नायिकांचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजनाला आपण आतापर्यंत मॉडर्न अंदाजात पाहात आलोय. मात्र गणपती विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने संजनाचा नऊवारी साडीतला हटके लूक पाहायला मिळणार आहे.

तर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील गौरी आणि शालिनीने पारंपरिक साडीला आधुनिकतेची जोड देत सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधती आणि 'रंग माझा वेगळा' मालिकेतील सौंदर्या इनामदार यांचं साडीमध्ये सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे.

स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2021 हा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचा डबल धमाका असणार आहे.

ढोल-ताश्यांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यापासून ते अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं अगदी जल्लोषात पार पडणार आहे.

सणासुदीचे दिवस म्हटले तर आपले पारंपरिक खेळही ओघाने आलेच. स्टार प्रवाहच्या मालिकांमधल्या तुमच्या आवडीच्या सासु-सुनांच्या जोड्या मंगळागौरीचे खास खेळ देखील खेळणार आहेत. त्यामुळे मनोरंजनाने परिपूर्ण असा हा गणपती विशेष कार्यक्रम असेल.

रविवार 12 सप्टेंबरला संध्याकाळी 7 वाजल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घरबसल्या घेता येईल.

बातम्या आणखी आहेत...