आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॉलेजमधील प्रेमकथा आणि या प्रेमाला असलेली गावच्या राजकारणाची किनार अशी "स्टोरी ऑफ लागिरं" या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 14 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, उत्तम अभिनय, श्रवणीय गाणी, नेत्रसुखद छायांकन यांचा मिलाफ या चित्रपटात झाला आहे.
"स्टोरी ऑफ लागिरं" या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. रॉयल समृद्धी असोसिएट्स आणि स्वरुप सावंत प्रस्तुतकर्ते असून जी. के. फिल्म्स क्रिएशस व मिडियावर्कस् स्टुडियोनी निर्मिती केली आहे. बी. एन. मेश्राम चित्रपटाचे निर्माते, यामिनी वाघडे सहनिर्मात्या आहेत. रोहित राव नरसिंगे यानी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. मंगेश गाडेकर यांनी छायांकन, सनी-सुशांत आणि सिद्धेश कुलकर्णी - अतुल जोशी यांची संगीत, निहार राजहंस, बी. गोपानारायण यांनी गीतलेखन, अनिल मदनसुरी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली तर मीडिया वर्क्स स्टुडिओने पोस्ट प्रॉडक्शनची जबाबदारी निभावली आहे.
रोहित राव नरसिंगे, चैताली चव्हाण, ऋतुजा अंद्रे, मोहन जाधव, सोमनाथ येलनूरे यांच्यासह अभिनेते संजय खापरे, मिलिंद दास्ताने, प्रेमाकिरण या अनुभवी कलाकारांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणारी प्रेमकथा या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. प्रेम, राजकारण, गावातील हेवेदावे, तीव्र सत्तासंघर्ष असे अनेक पदर या चित्रपटाच्या कथेला असल्याचा अंदाज ट्रेलरमधून बांधता येतो. नव्या दमाच्या कलाकारांचा उत्तम अभिनय हे चित्रपटाचं वैशिष्ट्य आहेच. त्याशिवाय श्रवणीय गाणी आणि उत्तम छायांकनामुळे हा ट्रेलर लक्ष वेधून घेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.