आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्हीवर सुबोधचे कमबॅक:'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेतून सुबोध भावे छोट्या पडद्यावर परततोय, दिवाळीच्या मुहूर्तावर मालिका येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिवाळीच्या मुहूर्तावर सुबोधची नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

लॉकडाऊननंतर एंटरटेन्मेंट इंडस्ट्री आता हळूहळू पुर्वपदावर येत आहे. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतही कामकाज सुरु झाले आहे. अनेक नवीन मालिकांचे प्रोमोज छोट्या पडद्यावरील विविध वाहिन्यांवर झळकू लागले आहेत. नुकतीच छोट्या पडद्यावर शुभमंगल ऑनलाइन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेता सुबोध भावेच्या कान्हाज मॅजिक या निर्मिती संस्थेची ही पहिलीच मालिका आहे. आता सुबोधच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे सुबोध छोट्या पडद्यावर परततोय. तुला पाहते रे या मालिकेनंतर सुबोध ब-याच कालावधीपासून छोट्या पडद्यावर दिसला नाही. मात्र यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर त्याची नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत असून चंद्र आहे साक्षीला हे या मालिकेचे नाव आहे. सुबोधने मालिकेचा टीझर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यासह त्याने लिहिले, ''मालिकांशी जोडलेली नाळ कधी तुटली नाही, पुन्हा एका नव्या रुपात तुमच्या समोर येतोय, #चंद्रआहेसाक्षीला, लवकरच.''

नव्या मालिकेविषयी आणि सुबोधच्या कमबॅकविषयी निखिल साने म्हणतात, ''आज Viacom18 साठी एक वर्तुळ पूर्ण होते आहे. सुरुवात झाली एका चित्रपटाने ‘आणि डॅा. काशिनाथ घाणेकर’... मग नाटक ‘अश्रुंची झाली फुले’ आणि आता नवी मालिका! या सगळ्यातील महत्वाचा, समान धागा म्हणजे सुबोध भावे! आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे की ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेद्वारे कलर्स मराठीवर एका दैनंदिन मालिकेच्या माध्यमातून सुबोधचे पदार्पण होत आहे. येत्या दिवाळीच्या शुभमुहुर्तावर या नव्याकोऱ्या मालिकेचे आगमन होत आहे. सुबोध.. या सर्व प्रवासासाठी तुझे मनापासून आभार आणि खूप खूप शुभेच्छा!''

काही दिवसांपूर्वीच सुबोधने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका पाठमो-या व्यक्तीचे पोस्टर शेअर केले होते. त्यात पार्श्वभूमीवर चंद्र होता. एक ऑफलाईन धक्का, असे कॅप्शन सुबोधने या पोस्टला दिले होते. त्यामुळे त्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली होती.

ही नवी मालिका कलर्स मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे. सध्या मालिकेच्या कथानक आणि इतर कलाकारांची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser