आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीव्ही अपडेट:वहिनीसाहेबांचा दरारा आता पुन्हा अनुभवायला मिळणार, सुचित्रा बांदेकर-भार्गवी चिरमुलेची गाजलेली मालिका 'वहिनीसाहेब' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही मालिका 'झी क्लासिक' या खास सेगमेंटमध्ये 27 जुलै पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 6 यावेळेत प्रेक्षकांना बघता येणार आहे.

छोट्या पडद्यावरील गाजलेली आणि प्रेक्षकांची आवडती मालिका 'वहिनीसाहेब' आता लवकरच झी युवा या वाहिनीवर प्रेक्षकांना पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. शरद पोंक्षे, सुचित्रा बांदेकर आणि भार्गवी चिरमुले सारख्या अतिशय तगड्या कलाकरांची जमलेली भट्टी पाहण्याची सुवर्णसंधी झी युवामुळे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मिळणार आहे.

घराला घरपण देणारी असते 'ती'.. त्या घरातील स्त्री, आई, मुलगी, बहीण, सुन अशा वेगवेगळ्या भूमिकेतून ती घर सजवत असते. घरातील आई ही एकेकाळची सुन असते. अनेक वेळा केवळ घराची घडी व्यवस्थित बसण्यासाठी समोर येणाऱ्या संकटांशी, नियतीच्या लहरींशी टकरा देऊन घरी येणारी ही सून ‘वहिनीसाहेब’बनून डोंगराएवढी मोठी होत जाते. मात्र तिची परिस्थिती खरंच बिकट असते जेव्हा तिची ओळख, तिचे हक्क तिचा नवराच डावलतो. यावरच आधारित 'वहिनीसाहेब' ही मालिका म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील सुनेची कथा आहे.

या मालिकेच्या पुनः प्रक्षेपणाद्वारे झी युवा ही वाहिनी महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातील वहिनीसाहेब यांना मानाचा मुजरा करत आहे.