आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरीची पहिली मंगळागौर:'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत रंगणार मंगळागौरीचा रंगणार खेळ, पण येणार विघ्न

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गौरीच्या मंगळागौरीत येणार का विघ्न?

श्रावण महिना आला की चाहूल लागते ती सणांची. श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. मंगळागौरीच्या सणाचा जल्लोष स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मालिकेतही पाहायला मिळणार आहे.

गौरीची पहिलीच मंगळागौर असल्यामुळे साग्रसंगीत पूजा पार पडणार आहे. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने असा शिर्केपाटील कुटुंबातील सर्वच स्त्रियांचा थाट विशेष लक्ष वेधणार आहे. लाडक्या सुनेसाठी माई म्हणजेच नंदिनी शिर्केपाटील यांनी देखील मंगळागौरीच्या खेळामध्ये सहभाग घेतला आहे.

एकीकडे उत्साहाचं वातावरण असताना जयदीपच्या अटकेने मात्र आनंदाला गालबोट लागणार आहे.

मंगळागौरीची पूजा सुरु असतानाच जयदीपला अटक करण्यासाठी पोलीस दाखल होतात. जयदीपचा नेमका गुन्हा काय हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गौरीच्या पहिल्या मंगळागौरीच्या पुजेत आलेलं हे विघ्न कसं दूर होणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.

बातम्या आणखी आहेत...