आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुख म्हणजे नक्की काय असतं:जयदीप-गौरी पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत, प्री वेडिंग फोटोशूटसाठी शिर्केपाटील कुटुंबाची रेट्रो लूकला पसंती

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब या लग्नाच्या निमित्ताने हटके अंदाजात दिसणार आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये लवकरच जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा थाट पाहायला मिळणार आहे. माई आणि दादांच्या इच्छेखातर पुन्हा एकदा लग्नाचा घाट घालण्यात आला आहे.

शिर्केपाटील कुटुंबात एखादा सणसमारंभ असो वा कोणतंही शुभकार्य ते थाटातच पार पडतं. त्यामुळे जयदीप-गौरीचं लग्न देखील अगदी थाटात पार पडणार आहे. प्री वेडिंग फोटोशूटपासून, मेहंदी, हळद, वरात आणि लग्नाचा शाही थाट पाहायला मिळेल. लग्नात जयदीप गौरीचा लूक नेमके कसा असणार याची उत्सुकता आहे.

प्री वेडिंग फोटोशूटसाठी जयदीप-गौरीसह संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाने रेट्रो लूकला पसंती दिली आहे. जयदीप-गौरी काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांच्या रुपात दिसणार आहेत.

उदय आणि देवकी दिसतील दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या रुपात.

शेखर-रेणुकेने अशोक सराफ आणि रंजना यांच्यासारखा लूक केलाय तर मल्हार बनलाय दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. माई आणि दादा यांनी सुद्धा 70 च्या दशकातला लूक धारण केला आहे.

अम्मा दिसणार आहे ललिता पवार यांच्या रुपात. संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब या लग्नाच्या निमित्ताने हटके अंदाजात दिसणार आहे.

खरंतर खूप काळानंतर आणि खूप संघर्षानंतर शिर्केपाटील कुटुंब आनंदात आहे. त्यांच्या या आनंदात प्रेक्षकांनी देखील सहभागी व्हावं अशी इच्छा आहे.

बातम्या आणखी आहेत...