आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आनंदाचा क्षण:‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचे 100 भाग पूर्ण, निर्माते महेश कोठारे म्हणाले...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महेश कोठारे यांनी या सेलिब्रेशनचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने नुकताच 100 भागांचा टप्पा पार केला. या निमित्ताने सेटवर केक कापून आनंद साजरा करण्यात आला. याप्रसंगी मालिकेच्या संपूर्ण टीमसोबतच निर्माते महेश कोठारेदेखील उपस्थित होते.

महेश कोठारे यांनी या सेलिब्रेशनचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. ''सुख म्हणजे नक्की काय असतं' - 100 भागांच्या या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार'', असे महेश कोठारे म्हणाले आहेत.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. जयदीप-गौरीसोबतच मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करत आहेत. त्याचीच पोचपावती म्हणून मालिकेने यशस्वीरित्या 100 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे.

मालिकेचं कथानक सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. जयदीप-गौरीच्या आयुष्यात पुन्हा एकदा ज्योतिकाने प्रवेश केला आहे. गौरीला जयदीपपासून दूर करण्यासाठी तिचे प्लॅन्स सुरु आहेत. साधीभोळी गौरी ज्योतिकाला धडा शिकवणार का? हेदेखील मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser