आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ती परी अस्मानीची...:'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील गौरीचा मेकओव्हर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा, कशी दिसतेय प्रेक्षकांची लाडकी गौरी...?

स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील गौरीला आतापर्यंत आपण साडीमध्ये पहात आलोय. पण लवकरच मालिकेत गौरीचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळणार आहे. जयदीपच्या मित्रमंडळींनी आयोजित केलेल्या एका खास पार्टीसाठी गौरीने मेकओव्हर केलाय. पार्टी गाऊन मधला गौरीचा अंदाज पाहून जयदीपच्या मनात तर परी म्हणू की अप्सरा ही एकच भावना आहे.

या पार्टीसाठीची सगळी तयारी जयदीपनेच केलीय. पार्टीमध्ये काय घालायचं, कसं वावरायचं या सगळ्या टिप्स जयदीपने गौरीला दिल्या आहेत.

गौरीची भूमिका साकारणारी गिरीजा स्वतःला या नव्या रुपात पाहून फारच भारावून गेलीय. संपूर्ण टीमने मिळून तिचा हा लुक डिझाईन केला आहे. हा सीन करताना सेटवरही नवा उत्साह संचारला होता.

जयदीप गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं आहे. हेच प्रेम मालिकेतल्या या नव्या वळवला सुद्धा मिळेल हीच आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...