आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुखाच्या सरींनी हे मन बावरे:चार महिन्यांनी सेटवर परतला शशांक केतकर, म्हणाला - 'जणू शूटचा पहिलाच दिवस आहे असे वाटले' 

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिद्धार्थ आणि अनुच्या नात्यातला गोडवा अधिक वाढणार, अनु देणार गोड बातमी
Advertisement
Advertisement

कलर्स मराठीवरील 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे.मालिकेमधील अनु - सिद्धार्थची केमिस्ट्री पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. त्यांच्या नात्यातील वैशिष्ट्य म्हणजे त्यांच निस्वार्थी नात, एकमेकांनमधील विश्वास आणि प्रेम, तसेच एकमेकांच्या मिळालेल्या खंबीर साथीमुळे संकटावर त्यांनी केलेली मात... हे सगळं एकदा पुन्हा नव्या घटनांसोबत प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 

सिध्दार्थची भूमिका साकारणारा शशांक केतकर म्हणाला ‘मी जवळपास चार महिन्यांनी सेटवर गेलो आणि समोर आमची टीम उभी होती तेव्हा असं वाटलं की, या सगळ्यांना खूप दिवसांनी भेटत नाहीये. आताच सुट्टी संपली आणि मी सेटवर आलो आहे. पण जेव्हा मंदार देवस्थळी यांचे लाईटस, कॅमेरा अॅक्शन हे शब्द कानावर पडले तेव्हा अचानक पोटात गोळा आला आणि मालिकेचा पहिला दिवस आठवला. एखादी मालिका सुरू असताना सगळं नवीन वाटणं ही मला खूप सकारात्मक गोष्ट वाटली. सगळे मिळून काम करत आहोत एका नव्या जोमाने, उत्साहाने शूट सुरू झाले आहे. एकमेकांचा हातभार मिळतो आहे. आम्ही सगळेच पुन्हा एकदा उभं राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. खूप आनंद वाटतोय.'

सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाला सुरुवात झाली. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटाइजेशन करण्यात आले.

मालिका आता रंजक वळणावर पोहचली असून, मालिकांचे नवे भाग रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. येणा-या भागांमध्ये अनु आणि सिद्धार्थ यांच्या संसारात नव्या पाहुण्याची चाहुल लागणार आहे. म्हणजे येत्या भागांमध्ये अनु गोड बातमी देणार आहे. 

 

अनु आणि सिध्दार्थ येत्या 21 जुलैपासून रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. 

Advertisement
0