आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्टार प्रवाह वाहिनी नव्या वर्षात एक नवाकोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाचं नाव आहे ‘सून सासू सून’. सासू सुनेचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असंच काहीसं. सासू सुनेचं हेच गमतीशीर नातं या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात कुठेही घरातील कलह, कुरबुरी आणि मतभेद नसतील तर असेल तो फक्त आणि फक्त सुसंवाद. सासू- सुनांमध्ये हा सुसंवाद घडवून आणण्याचं काम करणार आहे अभिनेता पुष्कार श्रोत्री.
नव्या वर्षातल्या या नव्या पर्वणीबद्दल सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘सासू आणि सून हे नातं अनोखं आहे. कुटुंब आणि घर जपणाऱ्या या दोघी कधी मैत्रीणी तर कधी मायलेकी असतात. कधी कुरबुर असते पण ती क्षणिक. अश्या हळुवार नाती जपणाऱ्या दोघींना भेटुन समजून थोडा छान वेळ घालवता येईल असा का कार्यक्रम आहे.’
'सून सासू सून' हा नवा कार्यक्रम येत्या 11 जानेवारीपासून सायंकाळी 5.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.