आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवा सांगितिक कार्यक्रम:आता सुरांचा मंच गाजवणार महाराष्ट्राच्या लेकी!! 5 एप्रिलपासून सुरु होतोय नवा कार्यक्रम 'सूर नवा ध्यास नवा’ – आशा उद्याची’

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 5 एप्रिलपासून सोम ते बुधवार रात्री साडे नऊ वाजता महाराष्ट्राच्या लेकी सुरांचा मंच गाजवणार आहेत.

छोट्या पडद्यावर लवकरच ‘सूर नवा ध्यास नवा’ – आशा उद्याची' हा नवीन सांगितिक कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाचं हे चौथं पर्व असून ते 15 ते 30 वयोगटातील फक्त मुलींचंच हे विशेष पर्व असणार आहे. या अनोख्या पर्वात गायक मुलींना गायक अवधूत गुप्ते आणि गायक महेश काळे मार्गदर्शन करतील. संगीतक्षेत्रातले हे दोन मान्यवर कलावंत ‘सूर नवा ध्यास नवा’च्या या पर्वातून महाराष्ट्राच्या नव्या सुरांचा शोध घेतील. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वांची लाडकी गुणी अभिनेत्री स्पृहा जोशी करणार आहे. येत्या 5 एप्रिलपासून सोम ते बुधवार रात्री साडे नऊ वाजता महाराष्ट्राच्या लेकी सुरांचा मंच गाजवणार आहेत.

कार्यक्रमाविषयी बोलताना महेश काळे म्हणाले की, “सूर नवा ध्यास नवा “ कार्यक्रम माझ्या हृदयाच्या खास जवळचा कार्यक्रम आहे. आणि यावेळचं पर्व तर महाराष्ट्रातील गायिकांचं पर्व आहे. त्यामुळे हा सीझन या प्रवासातला एक वेगळा अध्याय असणार आहे. “सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची” हा महाराष्ट्रातल्या गायिकांचा शोध आहे. त्यामुळे सुरांचा हा अद्भुत सोहळा असणार आहे आणि त्या सोहळ्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे.

अवधूत गुप्तेंसाठी हे पर्व खास असणार आहे कारण पहिल्यांदाच ते दुहेरी भूमिका पार पडणार आहेत म्हणजेच यावर्षी परीक्षणासोबत कार्यक्रमाचे निर्माते देखील आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले, “सूर नवा ध्यास नवा” हा कार्यक्रम पहिल्या पर्वाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. यंदाच्या वर्षी मात्र जबाबदारी वाढली आहे कारण, या चौथ्या पर्वाचा मी निर्माता देखील आहे. परीक्षक म्हणून मी जितक्या प्रामाणिकपणे ही जबाबदारी पेलत आलेलो आहे, तितक्याच प्रामाणिकपणे निर्माता म्हणून देखील माझी जबाबदारी मोठी आहे. आमच्या सर्वांसाठी हे पर्व अत्यंत महत्त्वाचं आहे कारण, कोरोनाच्या आव्हानाला तोंड देत हे पर्व दिमाखदार करण्याचं आव्हान संपूर्ण टीमपुढे आहे. महत्वाची बाब म्हणजे या पर्वात महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगातील सर्वच महिलांना मानवंदना देणारं हे पर्व असेल. हे पर्व महिलांसाठी विशेष असेलच पण त्यांच्या कुटुंबासाठी, त्यामधील पुरूष मंडळीसाठी देखील विशेष असणार आहे”.

कार्यक्रमाची सूत्रसंचालक स्पृहा जोशी कार्यक्रमाबद्दल म्हणाली, “यावेळी मुलींचं विशेष पर्व असल्याने खूपच आनंद होतो आहे. सेटवर प्रचंड उत्साह आहे. महाराष्ट्रातील तमाम मुलींना यानिमित्ताने एक नवी प्रेरणा मिळेल अशी मला खात्री आहे. कलर्स मराठीचं खूप कौतुक कारण त्यांनी अशा पध्दतीचे पर्व आणले”.

बातम्या आणखी आहेत...