आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा पौराणिक मालिकेत सुरभी हांडे:'गाथा नवनाथांची' मालिकेद्वारे सुरभीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारतेय देवी सप्तशृंगीची भूमिका

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या भूमिकेच्या माध्यमातून सुरभी टेलिव्हिजनवर पुनरागमन करते आहे.

सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर 'गाथा नवनाथांची' ही मालिका घेऊन आली आहे आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरते आहे. कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा नवनारायणांनी मनुष्यकल्याणासाठी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला.

आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा 'गाथा नवनाथांची' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्या कथांपैकी आता येत्या काही भागांत सर्वश्रुत असलेली मछिंद्रनाथ आणि देवी सप्तशृंगी यांची भेट पाहायला मिळणार आहे. नाथपंथामध्ये सप्तशृंगी देवीला विशेष स्थान आहे. सप्तशृंगी देवीच्या आशीर्वादाने मच्छिन्द्रनाथांच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होत असल्याची ही महत्त्वाची घटना आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मालिकेत सप्तशृंगी देवीची भूमिका सुरभी हांडे ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार आहे. सुरभीने याआधीही पौराणिक आणि सामाजिक विषय असलेल्या मालिकांमध्ये काम करून आपल्या अभिनयानी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मोठ्या विश्रांतीनंतर या भूमिकेच्या माध्यमातून ती टेलिव्हिजनवर पुनरागमन करते आहे.

बातम्या आणखी आहेत...