आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस मराठी – दिवस पंधरावा !:सुरेखाताईंनी व्यक्त केली मनातली खंत, म्हणाल्या - 'किचन एरियाला शून्य किंमत'

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नक्की असं काय झालं आहे ?

बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना काही काही गोष्टी मनाला खूप लागतात, सलत राहतात, जे त्या सगळ्यांपुढे मांडू शकत नाही आणि अशावेळी त्या गोष्टी आपल्या जवळच्या व्यक्तींशी शेअर करतात. सुरेखा कुडची आज त्यांच्या मनातील एक महत्वाची गोष्ट स्नेहा आणि जयला सांगताना दिसणार आहेत. नक्की असं काय झालं आहे ? अशी कोणती गोष्ट आहे ज्याचं त्यांना इतकं वाईट वाटलं आहे, राग आला आहे?

सुरेखा ताई स्नेहा आणि जयला सांगतात, “जेवण बनवताना उत्कर्ष, गायत्री, मीरा होते त्यावेळी मी तिला म्हटल स्नेहा पण होती तुम्ही सगळ्यांनी ठरवून आम्हा चौघांना बाजूला काढले आहे नॉमिनेट केले आहे. आम्ही तुमच्या दृष्टीने वीक आहोत. म्हणजे कोण दादुस, मी, तृप्ती आणि स्नेहा ही पण नको आहे त्यांना. म्हणून मला तो राग आला की, जेव्हा कॅप्टन बनवण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही विचार करता काय तर त्या टास्कमध्ये मस्त केलं. आम्ही नाही करू शकत, काही टास्कमध्ये आम्ही नाहीच खेळू शकतं. आपल्या इथे सांगतात युक्ति वापरा. आपल्याकडे अजिबात युक्ति वापरली नाही जात फक्त शक्तीचा वापर होतो जिथे आम्ही कमीच पडणार. आणि किचन एरिया जो आहे त्याला शून्य किंमत आहे. किती पण प्रेमाने करून घाला, जिवाचं रान करा त्याला किंमत नाहीये. त्याची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा आम्ही तिथून बाहेर पडू”.

अजून हे संभाषण किती पुढे गेले? कोण कोणते मुद्दे सुरेखाताईंनी मांडले, त्यावर स्नेहाचे काय म्हणण आहे? हे आजच्या भागामध्ये कळेल .

बातम्या आणखी आहेत...