आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तू सौभाग्यवती हो:सुर्यभान-ऐश्वर्या अडकणार लग्नाच्या बेडीत, लक्ष वेधून घेईल ऐश्वर्याचं लक्ष्मी मंगळसूत्र!

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांच्या लग्नाचा थाट तितकाच असणार आहे.

'तू सौभाग्यवती हो' या मालिकेत सध्या लगीन घाई बघायला मिळत आहे. ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा आगळा वेगळा विवाह सोहळा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा विवाह सोहळा फक्त आगळा वेगळा नसून भव्यदिव्य पण आहे. जाधव घराण्याला शोभून दिसेल अशा थाटात हे लग्न होणार आहे. आणि या लग्नात सर्वांचं लक्ष वेधून घेतंय ते म्हणजे ऐश्वर्याचं अनोखं मंगळसूत्र. ऐश्वर्या लक्ष्मीच्या पावलांनी जाधव घरात येणार आहे, म्हणूनच की काय ऐश्वर्यासाठी खास लक्ष्मीचं मंगळसूत्र बनवलं गेलं आहे.

करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांच्या लग्नाचा थाट तितकाच असणार आहे. हळद, मेहेंदी, लग्नात होणारे इतर रीतिरिवाज हे सगळं प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नात पाहायला मिळणार आहे. पण सूर्यभान ऐश्वर्याला बायकोचा दर्जा देऊ शकेल का? आणि त्याची मुलं तिला आपली आई मानतील का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...