आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

  लॉकडाऊन ट्रीट:सस्पेन्स थ्रीलर 'हॉस्टेजेस' वेबसीरिज आता मराठीत, 13 एप्रिलपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टार प्रवाह वाहिनीवर होणार प्रसारित

लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे नवनवे पर्याय घेऊन स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. 13 एप्रिलपासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर भेटीला येणार आहे 'हॉस्टेजेस' ही वेब सीरिज. जगभरात नावाजलेल्या या वेबसीरिजची हॉस्टेजेस ही भारतीय आवृत्ती आहे. हॉटस्टार स्पेशल्सने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. खास बात म्हणजे मराठी प्रेक्षकांना मराठीतून या वेबसीरिजचा आनंद घरबसल्या लुटता येणार आहे. सस्पेन्स थ्रीलर असणारी ही वेबसीरिज प्रेक्षकांची उत्कंठा वाढवेल यात शंका नाही.

'हॉस्टेजेस' ही संपूर्णपणे काल्पनिक गोष्ट आहे. ही गोष्ट आहे अशा डॉक्टरची जिच्यावर मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी सोपवण्यात येते. मात्र शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशीच त्या डॉक्टरच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. कुटुंबाला वाचवायचं असेल तर मुख्यमंत्र्यांचा जीव वाचता कामा नये अशी अट त्या डॉक्टरसमोर ठेवण्यात येते. या द्विधा मनस्थितीत डॉक्टर आपल्या कर्तव्याला जागणार की कुटुंबाचा जीव वाचवणार याची उत्कंठावर्धक गोष्ट म्हणजे हॉस्टेजेस ही वेबसीरिज.

सुधीर मिश्रा दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये रोनित रॉय, टिस्का चोप्रा, परवीन डबास, दलीप ताहिल, मोहन कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

बातम्या आणखी आहेत...