आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातातून थोडक्यात बचावला सुयश:कॅबला मालवाहू कंटेनरची जोरदार धडक, दैव बलवत्तर म्हणून बचावला सुयश टिळक; म्हणाला - ‘माणुसकी जिवंत आहे’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 28 फेब्रुवारीची ही घटना आहे.

मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुयश टिळक एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला आहे. सुयशने स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. 28 फेब्रुवारीची ही घटना आहे. रविवारी पहाटे सुयशचा अपघात झाला. तो कॅबने प्रवास करत असताना अचानक एक मालगाडी त्याच्या गाडीला येऊन धडकली. ही धडक इतकी भयंकर होती की, कॅब रस्त्याच्या कडेला उलटून पडली होती. या प्रवासादरम्यान गाडीत ड्रायव्हर आणि सुयश दोघेच होते. सुदैवाने कॅब ड्रायव्हर आणि सुयशला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे नुकसान झाले. त्यानंतर सुयशने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

सुयशने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वत:चा सेल्फी शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. ‘धन्यवाद, माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना आणि आशिर्वादासाठी तुमचे आभार. मी सुरक्षित आहे. काळजी करण्याचे कारण नाही. देवाच्या कृपेने मला मोठी इजा झालेली नाही. माणुसकी अजूनही जिवंत आहे,’ या आशयाची पोस्ट त्याने लिहिली आहे.

सुयश हा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार असून त्याने आजवर अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्याने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले आहे. अनन्या पांडे आणि ईशान खट्टर स्टारर ‘खालीपीली’ या बॉलिवूड चित्रपटामध्ये तो अलीकडेच झळकला होता.

बातम्या आणखी आहेत...