आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जस्ट मॅरिड:व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत लग्नाच्या बेडीत अडकले स्वप्नाली-आस्ताद, नोंदणी पद्धतीने झाले लग्न

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • godzee_photography च्या सोशल मीडिया अकाउंटवर आस्ताद आणि स्वप्नाली यांच्या लग्नाचे फोटोज बघायला मिळत आहेत.

मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा आस्ताद काळे लग्न बंधनात अडकला आहे. व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत 14 फेब्रुवारी रोजी आस्तादने अभिनेत्री स्वप्नाली पाटीलशी लग्न केले. या दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

godzee_photography च्या सोशल मीडिया अकाउंटवर आस्ताद आणि स्वप्नाली यांच्या लग्नाचे फोटोज बघायला मिळत आहेत.

लग्नात स्वप्नाली आणि आस्तादचा शाही अंदाज बघायला मिळतोय.

याशिवाय स्वप्नालीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटोदेखील godzee_photography ने शेअर केले आहेत.

याशिवाय सेलिब्रिटी प्रोमोटर्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वप्नालीने लग्नात घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘बागेत बाग राणीची बाग, आस्तादचा राग म्हणजे धगधगती आग’ असा हटके उखाणा स्वप्नालीने घेतला. तिचा उखाणा ऐकून तेथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांना हसू अनावर होते.

गेल्या काही वर्षांपासून आस्ताद आणि स्वप्नाली एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोतचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुली देखील दिली होती. अखेर ही जोडी 14 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकली.