आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छोटा पडदा:पम्मी घालणार स्वप्नील जोशीला भुरळ, 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर दोघेही थिरकणार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता प्रेक्षक त्यांचा डान्स परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

झी युवावरील आगामी मालिका 'तुझं माझं जमतंय'च्या प्रोमोमधून पम्मीने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडली आहे, पण आता हीच पम्मी 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी याला भुरळ पडणार आहे. पम्मी म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि स्वप्नील जोशी एकत्र चला हवा येऊ द्याच्या मंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

पम्मी हीला अभिनेत्री बनायची इच्छा आहे आणि ती एका चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे. पम्मी ही फिल्मी आहे, त्यामुळे चला हवा येऊ द्या च्या मंचावर स्वप्नील जोशी भेटल्यावर ती त्याच्या सोबत डान्स करण्याचा मोह आवरू शकली नाही. या दोघांनीही मिळून एक या मंचावर एक छान डान्स परफॉर्म केला.