आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्निल जोशीच्या एका हातात पिझ्झा दुसऱ्या हातात फावडं:अभिनेत्यासोबत नेमकं घडतंय तरी काय!, जाणून घ्या

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून स्वप्निल जोशीला ओळखले जाते. स्वप्निलने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सध्या स्वप्निल छोट्या पडद्यावर तू तेव्हा तशी या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. सध्या स्वप्निलने शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

स्वप्निल लवकरच परेश मोकाशींच्या आगामी वाळवी या चित्रपटात झळकणार आहे. त्याने आपल्या पोस्टमधून आगामी चित्रपटाची झलक दाखवली आहे. ज्यात त्याच्या एका हातात पिझ्झा आणि एका हातात फावडं दिसत आहे. "एका हातात पिझ्झा, दुसऱ्या हातात फावडं... स्वप्निल जोशीसोबत नेमकं घडतंय काय? नव्या वर्षात सगळी सिक्रेट्स उलगडतील.. ‘वाळवी’ 13 जानेवारी 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित." असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

स्वप्निलसोबत या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. सुबोधनेही त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या पात्राची झलक दाखवली आहे. त्याच्या एका हातात अगरबत्ती आणि दुस-या हातात वेफर दिसतंय. गुढ उलगडेल थेट नव्या वर्षात, असे सुबोधने म्हटले आहे.

अभिनेत्री अनिता दातेचा लूकही रिव्हील करण्यात आला आहे. अनिताच्या हातात केकचा तुकडा दिसतोय. 'हे कसले सेलिब्रेशन आहे?', असे कॅप्शनमध्ये अनिताने लिहिले आहे.

तर शिवानी सुर्वे या चित्रपटात डेंटिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा लूक रिव्हिल करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "तुमची बत्तीशी घशात घालेल. ही आहे सुंदर डेंटिस्ट, हिच्याबद्दल आणखीन कळेल लवकरच."

कलाकारांच्या या लूकवरुन दिग्दर्शक परेश मोकाशींच्या वाळवी या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. हा चित्रपट 13 जानेवारी 2023 पासून प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...