आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शूटिंग अपडेट:'स्वराज्यजननी जिजामाता' मालिका घेणार लीप, जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री भार्गवी चिरमुले

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेत आता नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत.

'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे. जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला आहे. शहाजी राजांना बंगळूर प्रांतात जावं लागलं असून जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्यात आल्या आहेत. आता या पुढे मालिकेत प्रेक्षकांना स्वराज्य बांधणीची रोमांचकारी कथा आणि महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार असून मालिकेत प्रेक्षकांना नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत.

जिजाऊ माँ साहेबांची भूमिका भार्गवी चिरमुले ही अभिनेत्री करणार आहे, तर शहाजी राजांची भूमिका शंतनू मोघे हा अभिनेता करणार आहे. शिवबांच्या भूमिकेत दिवेश मेडगे हा बालकलाकार दिसणार आहे. दिवेशने या आधी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छोट्या संभाजीची भूमिका साकारली होती. नुकतीच या मालिकेत अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची एंट्री झाली आहे.

स्वराज्य घडवणाऱ्या मुलुखावेगळ्या आईची गाथा 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळत आहे.