आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूट स्टार्ट:कुमारच्या आयुष्यात आलेली 'ती' कोण? लवकरच होणार उलगडा; ‘समांतर-2’ चे पाचगणीमध्ये चित्रीकरण सुरु

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसऱ्या सीझनमधील नितीश भारद्वाज-स्वप्निल जोशी यांच्या अभिनय जुगलबंदीची प्रेक्षकांना प्रतीक्षा

‘समांतर’ वेब सीरिजच्या पहिल्या सीझनच्या अभूतपूर्व यशानंतर वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा प्रत्येकालाच लागून राहिली आहे. या सीरिजचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे सुरू आहे. नुकतेच या मालिकेतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ या चित्रीकरणासाठी एकत्र आले होते. या वेब सीरिजच्या दुसऱ्या पर्वामध्ये स्वप्नील जोशी आणि नितीश भारद्वाज यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी प्रेक्षक आसुसले असतानाच निर्मात्यांनी मात्र दुसऱ्या सीझनमध्ये बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याचे सुतोवाच केले आहे.

अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जीसिम्स’ची (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट अँड मिडीया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड) निर्मिती असलेल्या ‘समांतर’च्या पहिल्या सीझनला तब्बल 200 दशलक्ष हिट्स मिळाले होते आणि तो एक विक्रम मानला जातो. जगभरातील प्रेक्षकांना आता या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची प्रतीक्षा आहे.

सुदर्शन चक्रपाणीच्या भूमिकेत नितीश भारद्वाज भूमिकेत आहेत. स्वप्निल जोशीची कुमार महाजनची भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली होती. त्याच्या चाहत्यांना ती खूप आवडली होती. या सर्वच कारणांनी या वेब सीरिजबद्दलची रसिकांची प्रतीक्षा ताणली गेली आहे.

दुसऱ्या पर्वाचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे सुरु आहे. या चित्रीकरणात नुकतेच स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित सहभागी झाले होते. दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्याबरोबर यावेळी निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदारसुद्धा हजर होते. या सर्वांनी दुसरे पर्व लवकरच दाखल करत असल्याचे म्हटले आणि ते पहिल्या सीझन प्रमाणेच अत्यंत लोकप्रिय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

‘समांतर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ने वेब सीरिज क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘एमएक्स प्लेयर’च्या माध्यमातून ‘ओव्हर-द-टॉप’ व्यासपीठावरून ही मालिका प्रसारित झाली. पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते तर दुसरे पर्व समीर विद्वांस दिग्दर्शित करत आहेत.

अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार म्हणाले, “समांतर’ ही आमची निर्मिती असलेली पहिली वेब सीरिज आहे. मराठी प्रेक्षक हा कथेच्या बाबतीत फार चोखंदळ असतो. सुहास शिरवळकर यांच्या दर्जेदार लेखणीतून साकारलेल्या कादंबरीवर आधारित ही वेब सीरिज असल्याने ती रसिकांना खूप आवडली. उत्तम कथेबरोबरच सकस अभिनय, तेवढेच ताकदीचे दिग्दर्शन आणि खिळवून ठेवणारी हाताळणी यामुळे वेब सीरिजच्या पहिल्या पर्वाला उत्तम प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या पर्वतही आम्ही तेवढीच दर्जेदार हातळणी दिली असून काही नवीन पैलू त्यात दाखल केले आहेत. त्यामुळे प्रेक्षक या दुसऱ्या पर्वालासुद्धा तेवढेच डोक्यावर घेतील, अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे,” असेही ते पुढे म्हणाले.

सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सीरिज बेतली आहे. यातील कुमार महाजनला एके दिवशी कळते की त्याचे आयुष्य हे सुदर्शन चक्रपाणी आधीच जागून गेला आहे. तो मग त्याच्या भविष्यामध्ये काय लिहिले आहे, याचा शोध घेवू लागतो. सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडल्याप्रमाणे आता कुमारच्या आयुष्यातदेखील एका स्त्रीचा प्रवेश होणार असतो. ती कोण आहे? याचा उलगडा आता दुस-या भागात होणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser