आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'सैराट' सारख्या यशस्वी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेला बाळ्या म्हणजेच अभिनेता तानाजी गालगुंडे आता मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 'मन झालं बाजिंद' या मालिकेत तानाजी मुंज्याची व्यक्तिरेखा साकारतोय आणि ही व्यक्तिरेखासुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय.
तानाजी हा पहिल्यांदाच टेलिव्हिजन या माध्यमात काम करतोय आणि त्याबद्दलचा अनुभव शेअर करताना तानाजी म्हणाला, "टेलिव्हिजन या माध्यमात काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे. हे माध्यम मुळातच खूप फास्ट आहे. या माध्यमातून आपण खूप कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. तसंच या माध्यमात काम पण खूप वेगवान असतं ते मला अंगवळणी पडताना थोडं कठीण जातंय पण मालिकेची टीम खूपच सपोर्टिव्ह आहे त्यामुळे ते मला सांभाळून घेतात."
तानाजी पुढे सांगतो, "चित्रपटात काम करताना आपल्याकडे खूप वेळ असतो. महिनाभर आधी स्क्रिप्ट मिळते मग त्यावर चर्चा होते पण टेलिव्हिजनमध्ये तसं नसतं. इथे स्क्रिप्ट हातात आली की लगेच सीन करायचा असतो. पण इथे सगळे मला सांभाळून घेत आहेत."
प्रेक्षकांना तानाजीची मुंज्या ही व्यक्तिरेखा खूप आवडतेय. या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल बोलताना तानाजी म्हणाला, "मुंज्या या माझ्या व्यक्तिरेखेसाठी प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मला मिळतोय. मुंज्याला पाहताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. मुंज्याच्या कॅरेक्टरमध्ये असणारा निरागसपणा, त्याचा होणारा गोंधळ आणि त्याच्या रिऍक्शन्स पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतंय."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.