आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सायफाय लव्हस्टोरी:'अजूनी' चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर लाँच,  साकार राऊत चित्रपटातून उलगडणार परग्रहवासीयाची प्रेमकथा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पियूष रानडे, प्रणव रावराणे यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठी चित्रपटात विविध विषय हाताळण्यात येत असले तरी सायफाय चित्रपटांची उणीव आहे. मात्र परग्रहवासीची गोष्ट 'अजूनी' या चित्रपटातून उलगडणार आहे. त्यामुळे सायफाय कथानक उणीव आता 'अजूनी' हा चित्रपट भरून काढणार आहे.

संघर्षयात्रा, शिव्या असे उत्तम चित्रपट केलेला दिग्दर्शक साकार राऊत एक अनोखी कथा अजूनी या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर सादर करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. पियूष रानडे, प्रणव रावराणे, श्वेता वेंगुर्लेकर, प्रतीक देशमुख यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

साकार राऊत यांच्या आजवरच्या चित्रपटांपेक्षा "अजूनी" हा चित्रपट खूपच वेगळा ठरणार आहे. चित्रपटाचा विषय आणि कथानक अतिशय वेगळं असल्याचं, सायफाय कथानकाला प्रेमाचा पदर असल्याचं टीजरमधून दिसून येत आहे. या चित्रपटात परग्रहवासीची भूमिका कोणी साकारलीय? हे अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र या चित्रपटाविषयी आता अधिक कुतूहल निर्माण झालं आहे. अर्थ स्टुडिओज आणि सारा मोशन पिक्चर्स यांनी "अजूनी" या चित्रपटाची निर्मिती केली आहे.