आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा पडदा:'ती परत आलीये' मालिकेचा क्लायमॅक्स, लवकरच होणार 'ती'चा पर्दाफाश

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालिका शेवटच्या अतिशय रंजक वळणावर येऊन ठेपली आहे.

'ती परत आलीये' असं म्हणत आख्ख्या महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवणारी ही मालिका आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. मालिकेचं रहस्यमय कथानक आणि खिळवून ठेवणारे प्रसंग तसेच व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांची मन जिंकलीच पण त्याचसोबत मालिकेच्या कथानकाला पुरेपूर न्याय देखील दिला.

मालिकेच्या सुरुवातीपासूनच ती परत आलीये म्हणजे ती नक्की कोण आहे? या प्रश्नाने प्रेक्षकांना भंडावून सोडले. आता लवकरच मालिकेत 'ती'चा पर्दाफाश होणार असून या सगळ्यामागे नक्की कोण आहे हे प्रेक्षकांना कळेल. एकामागे एक चालू असलेल्या हत्येच्या मालिकेमागे नक्की ती आहे तो याच रहस्य उलगडणार असून संपूर्ण महाराष्ट्राला 'ती' कोण आहे? याचे उत्तर मिळणार आहे. त्यामुळे हे रहस्य जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा अजूनच वाढली आहे. ती परत आलीये मालिकेचा क्लायमॅक्स बघायला विसरु नका.

बातम्या आणखी आहेत...