आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'कानभट' या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर अलीकडेच लाँच करण्यात आले आहे. अपर्णा होशिंग दिग्दर्शित या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. 'कानभट' मधील मुख्य भूमिकेतील अभिनेता भव्य शिंदेने आपल्या लूकमुळे सर्वांना आश्चर्य चकित केलंय. या उत्सुकता वाढवणाऱ्या मोशन पोस्टरमध्ये अभिनेता भव्य शिंदे दिसतोय, जो मंदिरात उभा आहे आणि समोर प्रवाही गंगा नदी आहे. त्याच्यासमोर अभिनेता ऋग्वेद मुळे एका पुजाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत.
चित्रपटाची कथा एका लहान मुलाची स्वप्न आणि इच्छा या भावनांवर बेतलेली आहे. त्या मुलाच्या जीवनात नियतीने काहीतरी वेगळेच वाढून ठेवले आहे, ज्यामुळे तो एका अकल्पित वाटेवर जातो, ज्यामुळे त्याचे जीवनच बदलून जाते. कथेत वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविले गेले आहेत. पण हे केवळ तर्क आहेत. चित्रपटाबद्दल अजून जाणून घेण्यासाठी चाहत्यांना ट्रेलर रिलीज पर्यंत वाट बघावी लागेल.
दिग्दर्शक आणि निर्माता अपर्णा एस. होशिंग आपल्या चित्रपटाबद्दल सांगताना म्हणाल्या, “मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटाच्या पोस्टरला लोकांकडून जो उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. मला माझ्या पहिल्या चित्रपटासाठी असाच विषय शोधायचा होता, जेथे आधुनिक आणि पारंपारिक मूल्ये इतरांशी जोडली जातील. आणि अगदी तशीच कानभटची ही कथा स्वप्नाविषयी आणि वास्तवाविषयी भाष्य करते. ”
अपर्णा एस होशिंग दिग्दर्शित 'कानभट' ची निर्मिती, आपल्या रॅश प्रॉडक्शन या बॅनरखाली स्वतः अपर्णा होशिंग यांनी केली आहे. हा चित्रपट येत्या 19 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. गेल्या दशकभरापासून बॉलिवूड मध्ये कार्यरत असणाऱ्या अपर्णा एस होशिंग यांनी 'जीना है तो ठोक डाल, 'उटपटांग' आणि नील नितीन मुकेश स्टारर 'दशहरा'सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.