आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पोस्टर रिलीज:सिनेरसिकांना रिफ्रेश करणारा 'लॉ ऑफ लव्ह' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिनेसृष्टीत पदार्पण करणारा नवा चेहरा अभिनेता जे. उदय, अभिनेत्री शाल्वी शाह आणि जे. उदय यांची नवी कोरी जोडी
  • धडाकेबाज ऍक्शन आणि डायलॉगची तुफान फटकेबाजी, प्रेमाच्या एक वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारी आणि मंत्रमुग्ध करणारी गाणी

गेल्या काही दिवसात ऑनलाइनच्या माध्यमातून आलेले लॉ ऑफ लव्ह सिनेमाचे टिझर पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रेक्षकांचा मुड रिफ्रेश करणारे ठरले. त्यामुळे सिनेमाच्या ऑफिशिअल पोस्टर बाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. जे नुकतेच सोशल मीडियामध्ये रिलीज झाले आहे. पोस्टरवर झळकणारे दोन नवे चेहरे या सिनेमाच्या निमित्ताने सिनेसृष्टीला मिळणार आहेत. मोठ्या पडद्यावर येण्याच्या दमदार तयारीत असलेला लॉ ऑफ लव्ह सिनेमा प्रेमाची नवीन व्याख्या सांगणारा आहे.

एखाद्याला सज्जड इशारा द्यायचा असेल तर ''कायद्यात राहिलात तर फायद्यात रहाल'' ही दमदार ओळ ऐकवली जाते मात्र असे बरेच विषय आहेत ज्यांच्या साठी कायदा आहे का? किंवा ते कायद्याच्या चौकटीत बसतात का? हे सांगणं काहीसं कठीण आहे. स्वतःचं विश्व नियम असेलला निसर्ग आणि प्रेम यांचं देखील असंच आहे. समुद्रासारखं अथांग आणि आकाशाप्रमाणे असीम असणाऱ्या प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर असं बेबंद प्रेम कायद्याच्या चौकटीत बहरेल का? यावर दृष्टीक्षेप टाकणारा लॉ ऑफ लव्ह हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळालेला हा विषय नव्याने मोठ्या पडद्यावर पाहणं सगळ्यांसाठी उत्तम पर्वणी ठरणार आहे. वेदिका फिल्म्स क्रिएशन निर्मित लॉ ऑफ लव्ह हा सिनेमा सिनेमागृहात येण्यासाठी सज्ज झाला आहे. कोणतेही नियम आणि बंधनं नसणारं प्रेम समाजमान्य किती असतं याबाबत शंकाच आहे. आजही प्रेमाचा प्रवास खडतर वाटांनी भरला आहे. असाच काहीसा प्रवास लॉ ऑफ लव्ह सिनेमाच्या कथेतून मांडण्यात आला आहे. आदित्य आणि साक्षी यांची ही हटके लव्ह स्टोरी अनेकांच्या मनाचा ठाव घेईल. लॉ ऑफ लव्ह सिनेमाच्या माध्यमातून जे. उदय आणि शाल्वी शाह यांची नवी कोरी जोडी या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सिनेमात अभिनेता मोहन जोशी, यतीन कार्येकर अनिल नगरकर आणि प्राची पालवे यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाची कथा, पटकथा आणि निमिर्ती जे. उदय यांचीच आहे. सिनेमातील संवाद जे उदय आणि मकरंद लिंगनूरकर यांनी लिहिले आहेत. दिग्दर्शन सी.एस. निकम यांनी केलं आहे. संगीतकार पी. शंकरम यांनी सिनेमाला संगीत दिले असून मुराड तांबोळी, पी. शंकरम आणि निलेश कोटके यांनी गीतलेखन केलं आहे. पी. शंकरम, मुग्धा इनामदार आणि राधिका अत्रे यांनी सिनेमातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. प्रेमाच्या एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारी आणि मंत्रमुग्ध करणारी गाणी सिनेमाची जान आहेत. धडाकेबाज ऍक्शन आणि डायलॉगची तुफान फटकेबाजी सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेणारी आहे. मुंबई, कुडाळ आणि कोल्हापूरच्या नयनरम्य ठिकाणी चित्रित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांना अनोखा अनुभव देईल. सिनेमाचे छायांकन मंजुनाथ नायक, संकलन मनीष शिर्के, कला सतीश बिडकर, नृत्य ताज खान, ऍक्शन देव राज, ध्वनी संरचना दिनेश उच्चील आणि शांतनु आकेरकर (डी सुपर साउंड) यांनी केली आहे. मनोरंजनात तसेच जगण्यातील तोच तोचपणा बाजूला सारत मस्त रिफ्रेश करणारा लॉ ओफ लव्ह सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होणार आहे.