आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शूटिंग अपटेड:केवळ 33 टक्के युनिटच्या उपस्थितीत मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात - आदिनाथ कोठारे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही मालिका, रात्री साडे आठ वाजता 'झी युवा' वाहिनीवर पुन्हा एकदा सुरु होते आहे.

छोट्या पडद्यावरील गाजत असलेली 'प्रेम पॉयजन पंगा' या मालिकेच्या चित्रीकरणाला लॉकडाऊननंतर पुन्हा सुरुवात झाली आहे. अर्थात, चित्रीकरण करत असताना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. 

मालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरु करण्याविषयी बोलताना, मालिकेचे निर्माते आदिनाथ कोठारे म्हणाले, "तुमच्या लाडक्या 'प्रेम पॉयजन पंगा' या मालिकेचे चित्रीकरण आता सुरु झाले आहे. कोविड-19साठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करत आहोत. केवळ 33 टक्के युनिटच्या उपस्थितीत काम सुरु करण्यात आले आहे. सेटवर उपस्थित असलेली मंडळी सामाजिक अंतराचे नियम पाळत आहेत. क्रूला पीपीई किट्स देण्यात आले आहेत. सेटवर प्रवेश करण्याआधी सॅनिटायझर्सचा वापर करणे बंधनकारक असून आरोग्यसेवा देण्यासाठी सेटवर एक टीम चोवीस तास उपस्थित असते. चित्रीकरण करत असताना कुठलाही नियम मोडणार नाही, याची संपूर्ण काळजी घेण्यात येतेय', असे आदिनाथने सांगितले.

राज्यशासन, सांस्कृतिक मंत्रालय यांच्यामुळे चित्रीकरण सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. आदेश बांदेकर, नितीन वैद्य, सुबोध भावे आणि अमोल कोल्हे यांचे आभारदेखील आदिनाथने मानले आहेत. 

0