आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आनंदाची बातमी:काय? नाट्यगृह सुरु होणार; स्पृहा जोशीने व्हिडिओ शेअर करत लिहिले, 'काहीतरी श्रवणीय.. प्रेक्षणीय.. उत्साहवर्धक..'

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'शुभारंभाचा नाट्यप्रयोग तुमच्या आवडत्या नाट्यगृहात 12 जुलै रोजी', या मेसेजची मराठी नाट्यरसिकांमध्ये चर्चा

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे जवळजवळ अडीच ते तीन महिने लॉकडाऊन होते. याकाळात चित्रपट, टीव्ही इंडस्ट्री पूर्णपणे ठप्प होती. पण आता हळूहळू पुर्वपदावर येत असून सरकारने आखून दिलेल्या गाइडलाइन अंतर्गत चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे नाट्यरसिकदेखील पुन्हा एकदा रंगभूमीवर नाटकं बघण्यासही आतूर झाला आहे. यातच सध्या सोशल मीडियावर एका पोस्टर आणि व्हिडीओ क्लिपची चर्चा होतेय. “शुभारंभाचा प्रयोग. तुमच्या सर्वात आवडत्या नाट्यगृहात. रविवार 12 जुलै, 2020” अशा आशयाच्या या पोस्टरने  अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नाटक सुरु होणार ही गोष्ट सुखावणारी असली तरी या पोस्टर व क्लिपने अनेक प्रश्नही रसिकांच्या मनात उभे राहत आहेत. अशातच अभिनेत्री स्पृहा जोशीनेदेखील अशाच आशयाचा एक व्हिडिओ शेअर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाट्यरसिकांसाठी नाट्यगृहांचे दरवाजे खुले होणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.   

मात्र हे नाटक नेमके कोणते आहे? ते कोण दिग्दर्शित करत आहे? त्यातील कलाकार कोण? प्रेक्षकांनी ते नेमके कसे पाहायचे? लॉकडाऊनच्या या काळात सर्व चित्रपट-नाट्यगृहे बंद असताना सरकारकडून प्रयोगांना परवानगी कशी मिळाली? प्रयोगाला येणाऱ्या रसिकांच्या सुरक्षिततेचे काय? असे अनेक प्रश्न आज मराठी नाट्यरसिकांमध्ये चर्चिले जात होते.  या सर्व प्रश्नांची उत्तरे रसिकांना 12 जुलै रोजी मिळणार आहेत.

रंगभूमीने अनेक आव्हाने पेलली, उलटवून लावली आणि ती नव्या उभारीने समर्थपणे उभी राहिली. आता तोच अध्याय पुन्हा एकदा गिरविला जाणार आहे. मायबाप प्रेक्षक मराठी रंगभूमीने पेललेल्या प्रत्येक आव्हानाच्यावेळी खंबीरपणे नाटकाच्या मागे उभे राहिले आहेत. यावेळीही ते या प्रयोगाच्या मागे उभे राहतील, याची पूर्ण खात्री ठेवत हा अनोखा प्रयोग सादर  होणार आहे.